वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव चौकात दुचाकीस्वारांना चिरडले
Accident News: वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडले. यात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. दुचाकीस्वारांना चिरडले. ( accident-news-bhardhaw-crushed two-wheelers-with-four-wheelers-one-killed-one-seriously )
दोन्ही गंभीर जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे हलविण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी नागपूरला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यु झाला.
हि पण बातमी वाचा: Accident News: वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू
विशाल देवीदास नाकाडे (वय 18) असे मृतकाचे नाव आहे. तर दुसरा गंभीर जखमी हा ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे उपचार घेत आहे. घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सुजुकी सेलेरियो एमएच 35, एजी-4251 क्रमांकाच्या चारचाकीने जनबंधू कुटुंब खामखुऱ्यावरून गोंदियाला जात होते.